
सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी खळबळजनक दावा केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर त्यांनी या प्रकरणाबाबत एक आक्रमक पोस्ट करत गंभीर आरोप केले आहेत. या हल्ल्याला धार्मिक कट्टरतेचा रंग असल्याचे त्यांनी नमूद केले होते. मात्र, त्यांच्या ताज्या दाव्याने प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे.