
बॉलिवूडमध्ये कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत मोठ्या वयाचे अनेक अभिनेते काम करताना दिसतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर'मध्ये अभिनेता सलमान खान हा त्याच्यापेक्षा लहान रश्मिका मंदानासोबत दिसला होता. त्यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. आता त्यापाठोपाठ अभिनेता सैफ अली खानदेखील त्याच्यापेक्षा २० वर्षांनी लहान मुलीसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटात तो २० वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत किसिंग सीन देताना दिसतोय.