
लोकप्रिय बॉलिवूड दिग्दर्शक साजिद खान याच्यावर २०१८ मध्ये मी टू या मोहिमेदरम्यान अनेक आरोप केले गेलं होते. त्यानंतर साजिदचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. मी टू मध्ये केल्या गेलेल्या आरोपांमुळे त्याचं आयुष्य मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ५४ वर्षाच्या साजिदचा अपमान केला गेला. त्याला नको नको ते सुनावलं गेलं. गेले ६ वर्ष तो याबद्दल काहीही बोलले नाहीत पण आता एका मुलाखतीत त्याने त्याचा त्रास सांगितलाय. त्याला मानसिक आणि शारीरिक काय काय त्रास झाला हे त्याने सांगितलंय. यामुळे आपली आई लवकर निधन पावली असं तो म्हणालाय.