
Bollywood News : साजिद नाडियाडवाला यांचा मुलगा सुभान नाडियाडवाला लवकरच रुपेरी पडद्यावर पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. ‘छिछोरे’, ‘हीरोपंती’ आणि ‘हाउसफुल’सारखे हिट चित्रपट देणाऱ्या साजिद यांच्यासाठी हा क्षण खास आहे, कारण यावेळी ते निर्माता म्हणून नव्हे तर एक वडील म्हणूनही नव्या इनिंगला सुरुवात करणार आहेत. सुभानच्या डेब्यूसाठी सध्या एक भव्य आणि भावनिक प्रेमकथा उभारली जात असून, या चित्रपटाचं टेम्पररी शीर्षक आहे – ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कहीं’.