
लोकप्रिय भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याने आज १२ मे रोजी त्याच्या कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. केवळ ३६ वर्षीय असलेली विराटने खूप कमी वयात कसोटी क्रिकेटमधून रिटायरमेंट घेतली. त्याच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. काही दिवसनापूर्वीच भारताचा हिटमॅन म्हणून ओळखला जाणारा रोहित शर्मा यानेही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. विराटचे चाहते सध्या त्याच्या या निर्णयावर नाखूष आहेत. मात्र त्याने अशी अचानक रिटायरमेंट का घेतली, असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला होता. तर दुसरीकडे विराटने रिटायरमेंट घेण्यात काहीतरी गौडबंगाल आहे अशी शंका लोकप्रिय संगीतकार सलील कुलकर्णी यांनी व्यक्त केलीये.