

salman khan on ramayana
esakal
सध्या संपूर्ण बॉलिवूडमध्ये फक्त एकच चर्चा आहे ती म्हणजे नितेश तिवारी यांच्या 'रामायण' या चित्रपटाची. या चित्रपटाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच जगात नेलं आहे. हिंदू धर्मातील पवित्र ग्रंथ असलेल्या 'रामायण'वर हा चित्रपट आधारित आहे प्रभू श्रीराम, सीता यांच्या आयुष्यातील एक एक प्रसंग या चित्रपटात जणू जिवंत करण्यात आला आहे. या चित्रपटाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. ५ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने २ दिवसात कोट्यवधींची कमाई केलीये. या चित्रपटात अभिनेता रणबीर कपूर, साई पल्लवी, रवी दुबे यांसारखे कलाकार आहेत. मात्र प्रेक्षक कौतुक करत असले तरी बॉलिवूड कलाकार मात्र चित्रपटाबद्दल बोलायला तयार नाहीत. अशातच आता सलमान खानने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिलीये जी चर्चेत आहे.