
बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा 'सिकंदर' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटला. या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी ढुंकूनही पाहिलं नाही. सलमानने कित्येक वर्ष इंडस्ट्रीवर राज्य केलं. मात्र आता त्याची जादू कमी होतेय की काय असं वाटत असतानाच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्याचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी डोक्यालाच हात लावलाय. या व्हिडिओमध्ये सलमान मुलींसोबत नाचताना दिसतोय. मात्र या व्हिडिओत त्याचं पोट टी शर्टमधून बाहेर डोकावतंय. जे पाहून नेटकरी भन्नाट कमेंट करत आहेत.