
बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. त्याच्या जवळच्या व्यक्तींवर आणि त्याच्या घरावर देखील अनेकदा गोळीबार झालाय. त्यामुळे त्याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तो कायम सुरक्षा रक्षकांच्या मध्ये असतो. इतकंच नाही तर आता त्याच्या घराच्या बाल्कनीत बुलेटप्रूफ काचही बसवण्यात आली आहे. आता सलमानने हे करण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.