
बॉलिवूड अभिनेता आमिर खान याच्या 'सितारे जमीन पर' या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री जिनिलिया देशमुखही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आमिर ३ वर्षानंतर मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाच्या प्रिमिअरचीदेखील सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. गुरुवारी मुंबईत या चित्रपटाचं प्रीमियर आयोजित करण्यात आला होता. मात्र यादरम्यान आमिरचा सगळ्यात मोठा मुलगा जुनैद खान याच्यासोबत असं काही घडलं की नेटकऱ्यांना हसावं की रडावं हेच कळेनासं झालं.