
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. जम्मू काश्मीरच्या या खोऱ्यात कधीकाळी शांतता आणि सौंदर्य होतं. मात्र आता तिथे निर्दोष भारतीयांची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यामुळे काश्मीरच्या पर्यटनावर त्याचा परिणाम झाला. काश्मीर लोकप्रिय होताच मात्र तो जास्त करून चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानदेखील तेथील सौंदर्य पाहून आश्चर्य चकीत झाला होता. शिवाय तिथे गेल्यावर मला माझ्या एक्स गर्लफ्रेंडची आठवण येते असं तो म्हणाला होता.