

sam from drishyam
esakal
अजय देवगनच्या 'दृश्यम ३' ची सगळीकडे जोरदार चर्चा आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अवघ्या ३ दिवसात २५० कोटींहून जास्तीचा गल्ला जमवलाय. हा चित्रपट अनेकांना पसंत पडलाय. त्यातलाच एक अभिनेता म्हणजे 'दृश्यम' मधला समीर देशमुख. 'दृश्यम'मध्ये ही भूमिका अभिनेता ऋषभ चड्ढा याने साकारली होती. तब्बूचा लाडावलेला मुलगा असलेला सॅम विजय साळगावकरच्या मुलीवर जबरदस्ती करतो आणि ती तिच्या हातून त्याचा खून होतो. त्यानंतर विजय साळगावकर आपल्या कुटुंबाला कसा वाचवतो यावर हा चित्रपट आहे. आता ऋषभने एक पोस्ट करत या चित्रपटात आपण नसल्याची खंत वाटत असल्याचं म्हटलंय.