Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

PUSHKARAJ CHIRPUTKAR AND BHUSHAN PRADHAN STARRER SAMARTH MOVIE: आजच्या पिढीला अध्यात्माकडे वळण्याची गरज का आहे, हे हा चित्रपट उत्तमरीत्या अधोरेखित करतो.
samarth movie review

samarth movie review

esakal

Updated on

आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जगात कित्येकदा आपल्या परंपरेचा, संस्कारांचा आणि जगण्याच्या साध्या मूल्यांचा आपल्याला कधी कधी विसरत पडतो. मोह-माया आणि असंख्य आकर्षणांमुळे स्वतःवर नियंत्रण ठेवणे कधी कधी कठीण होत जाते. मग आपल्या मनामध्ये अहंकाराची, क्रोधाची, अस्थिरतेची भावना वाढीस लागते. आपले मन स्थिर राहात नाही. मनामध्ये नैराश्येची भावना जागृत होते. अशा वेळी समर्थ रामदास स्वामींच्या ‘मनाचे श्लोकां’मधील मनावर नियंत्रण, शिस्त आणि सकारात्मकतेची शिकवण आजही मार्गदर्शक ठरते. याच विचारांना केंद्रस्थानी ठेवणारा मराठी चित्रपट म्हणजे ‘समर्थ’.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com