
स्टँडअप कॉमेडियन समय रैनाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये तो लंडनच्या रस्त्यांवर गाणं गाताना दिसत आहे. इंडियाज गॉट लेटेंट वादानंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. त्याच्या या शोमध्ये रणवीर अलाहबादियाने केलेल्या वक्तव्यानंतर तो कायदेशीर अडचणीत आला होता. त्यानंतर समय शेवटचा कॅनडामध्ये दिसला होता जिथे त्याने त्याचा पहिला परफॉर्मन्स दिला होता.