
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली. विशेषतः ‘जवान’ या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर जबरदस्त छाप पाडली. यामधील अनेक संवाद प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत गाजले. मात्र, सर्वाधिक चर्चेत राहिला तो संवाद म्हणजे – “बेटे को हाथ लगाने से पहले, बाप से बात कर।”