
SANDHYA SHANTARAM
ESAKAL
'पिंजरा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या लोकप्रिय ज्येष्ठ अभिनेत्री संध्या यांचं आज ४ ऑक्टोबर २०२५ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. गेले काही दिवस त्या आजारी होत्या. त्या व्ही शांताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांनी व्ही शांताराम यांच्या अनेक चित्रपटात काम केलं. यादरम्यानच त्यांचं व्ही शांताराम यांच्यावर प्रेम जडलं. ते देखील संध्या यांच्या प्रेमात होते. त्यांनी तिसरं लग्न संध्या यांच्याशी केलं. मात्र त्यामुळे त्यांच्या दुसऱ्या पत्नी जयश्री दुखावल्या गेल्या आणि त्यांनी व्ही शांताराम यांना घटस्फोट दिला. व्ही शांताराम यांच्या आजारपणात संध्या यांनी त्यांची खूप काळजी घेतली. संध्या यांच्या सावत्र मुलीने त्यांच्याबद्दल अनेक खुलासे केले होते.