स्टार प्रवाहवर नागीण बनली आणि माझं स्वप्न पूर्ण झालं! असं का म्हणाली 'मी कात टाकली'ची अभिनेत्री?

STAR PRAVAH SERIAL MI KAAT TAKALI: स्टार प्रवाहवर लवकरच 'मी कात टाकली' ही नवी मालिका सुरू होतेय. अशातच या मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने तिच्या भूमिकेविषयी आपलं मत मांडलंय.
SANIKA MOJAR

SANIKA MOJAR

ESAKAL

Updated on

स्टार प्रवाह आणि झी मराठी या दोन्ही वाहिन्यांवर नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या दोन्ही वाहिन्यांनी सापांवरील मालिकांची घोषणा केलेली. त्यात आता स्टार प्रवाहवर 'मी कात टाकली' या मालिकेची सुरुवात होतेय. नुकताच या मालिकेचा टीझर लॉन्च झाला. या मालिकेत कोणती अभिनेत्री दिसणार याबद्दल जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक होते. नागीण म्हणून कोण योग्य आहे यासाठी प्रेक्षकांनी नावंदेखील सुचवली होती. आता या मालिकेतील अभिनेत्रीने या मालिकेच्या निमित्ताने आपलं एक स्वप्न पूर्ण झाल्याचं म्हटलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com