
संजय छाब्रिया यांनी आजवर अनेक मराठी चित्रपटांची निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या बॅनरखाली केली आहे. आता ते ‘गुलकंद’ या आगामी चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत. ‘गुलकंद’चे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. सचिन मोटे यांनी लेखन केले असून, हा चित्रपट १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने निर्माते संजय छाब्रिया यांच्याशी साधलेला संवाद...