Duniyadari 2 : आता येतोय दुनियादारी २ ! संजय जाधव यांनी केली घोषणा

Duniyadari 2 Announcement : दिग्दर्शक संजय जाधव आणि निर्माते अमेय खोपकर यांनी 'दुनियादारी २' सिनेमाची घोषणा केली.
Team Duniyadari 2
Team Duniyadari 2Esakal

मराठी इंडस्ट्रीमधील सगळ्यात जास्त गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे दुनियादारी. स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, अंकुश चौधरी यांची मुख्य भूमिका असलेल्या या सिनेमाची क्रेझ अजूनही टिकून आहे.

या त्रिकुटाची धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. पुन्हा एकदा दुनियादारी सिनेमाच्या टीमने 'दुनियादारी २' ची घोषणा सोशल मीडियावर केली.

पार पडला सिनेमाचा मुहूर्त

नुकताच दिग्दर्शक संजय जाधव, सिनेमाचे निर्माते आणि सई, स्वप्नील, अंकुश यांच्या उपस्थित सिनेमाचा मुहूर्त दणक्यात पार पडला. अकरा वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येत असून पुन्हा एकदा हे त्रिकुट रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

सिनेमाचे निर्माते अमेय खोपकर, व्हिडीओ पॅलेसचे नानिक जयसिंघानी, प्रसाद भेंडे, निनाद आणि स्वाती खोपकर उपस्थित होते.

काही दिवसांपूर्वीच सईने केली होती घोषणा

काही दिवसांपूर्वी सई ताम्हणकरने मॅशेबल इंडियाच्या 'द बॉम्बे जर्नी' या शोमध्ये हजेरी लावली.यावेळी तिने सांगितलं कि,"आम्ही दुनियादारी सिनेमाच्या सिक्वेलवर काम करतोय. मी ही गोष्ट आधी कोणत्याही मुलाखतीमध्ये रिव्हील केली नाहीये. मी पहिल्यांदा या शोमध्ये बोलतेय. मी सिनेमाची स्क्रिप्ट वाचली आहे. ती खरंच खूप चांगली स्क्रिप्ट आहे. अजून आम्ही याविषयी घोषणा केली नाहीये आणि मला आशा आहे कि आम्ही हा सिनेमा बनवू. आता आम्ही फक्त सुरुवातीच्या टप्प्यावर काम करतोय."

तिच्या मुलाखतीतनंतर अनेकांनी त्यांचा हा प्रश्न यशस्वी व्हावा आणि 'दुनियादारी २' यावा अशी इच्छा व्यक्त केली होती.

दरम्यान, सिनेमाची घोषणा जरी सिनेमाच्या टीमतर्फे करण्यात आली असली तरीही सई, अंकुश आणि स्वप्नील व्यतिरिक्त या सिनेमात आणखी कोण कलाकार काम करणार ? सिनेमाची कथा काय असेल या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी चाहत्यांना आणखी थोडी वाट पाहावी लागेल. सिनेमाचं दिग्दर्शन या वेळीही दिग्दर्शक संजय जाधव करणार आहेत.

'या' पुस्तकावर आधारित होता दुनियादारी

दुनियादारी सिनेमाचा पहिला भाग सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी या पुस्तकावरच आधारित होता. कॉलेजला जाणाऱ्या मुलांची गोष्ट आणि कट्ट्यावरची धमाल कादंबरीच्या रूपात सुहास यांनी मांडली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com