
मराठमोळे अभिनेते संजय खापरे गेली कित्येक वर्ष मराठी इंडस्ट्रीचा भाग आहेत. त्यांनी अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्यात. काही दिवसांपूर्वीच ते 'लय लय आवडतेस तू मला' या मालिकेत सानिकाच्या वडिलांच्या भूमिकेत होते. मात्र त्यांची सगळ्यात जास्त लक्षात राहण्यासारखी भूमिका म्हणजे 'गाढवाचं लग्न' या चित्रपटातील स्त्री पात्र. आजही संजय यांचं हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी करिअरच्या सुरुवातीलाच हे पात्र का निवडलं याबद्दल भाष्य केलंय.