

लोकप्रिय मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नेहमीच चाहत्यांमध्ये चर्चेत असतो. त्याचा अभिनय असो किंवा त्याच्या कविता सगळंच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतं. तो नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी शेअर करताना दिसतो. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवतो. अशातच आता संकर्षणची एक पोस्ट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. यात त्याने त्याच्या बाबांच्या भूतदयेबद्दल सांगितलंय. आजारी बैलासाठी अभिनेत्याचे बाबा तडक परभणीला गेले. त्यानंतर काय घडलं हे त्याने पोस्टमधून सांगितलंय.