Sant Dnyaneshwaranchi Muktaai review: माऊली आणि त्यांच्या भावंडांची भक्तीमय गाथा; कसा आहे 'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' चित्रपट?
आता विश्वात्मकें देवें। येणे वाग्यज्ञें तोषावें।
तोषोनिं मज ज्ञावे। पसायदान हें॥
संत ज्ञानेश्वरांनी सर्व प्राणीमात्रांसाठी पसायदान स्वरूपी प्रसाद मागितला. सर्व प्राणीमात्रांमध्ये प्रेमाची, आपुलकीची भावना निर्माण व्हावी आणि सर्व प्राणीमात्रांच्या मनातील एकमेकांप्रती असणाऱ्या द्वेषाच्या भावनेचा नाश व्हावा...असे मागणे संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानातून मागितले. वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वर महाराजांनी रचला. संत निवृत्तीनाथ हे त्यांचे मोठे बंधू तर सोपानदेव आणि मुक्ताई ही त्यांची धाकटी भावंडे. असामान्य बुद्धिमता लाभलेली तसेच ज्या अलौकिक भावंडांच्या वलयात वाढलेली आणि भक्तियोग मार्गात पारंगत असलेली ज्ञानेश्वरांची संत मुक्ताबाई ही बहीण. याच थोर चार भावंडांच्या संतपणाची महती मुक्ताबाईच्या दृष्टिकोनातून मांडणारा चित्रपट म्हणजे ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा चित्रपट.