Sara Ali Khan : 'ए वतन' नंतर साराचा नवा सिनेमा येणार प्रेक्षकांच्या भेटीला; लूक पाहून चाहते थक्क

सध्याच्या तरुणाईची लाडकी अभिनेत्री सारा अली खान तिच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीजमुळे कायम चर्चेत असते.
Sara Ali Khan
Sara Ali Khansakal

सध्याच्या तरुणाईची लाडकी अभिनेत्री सारा अली खान तिच्या सोशल मीडिया ऍक्टिव्हिटीजमुळे कायम चर्चेत असते. तिच्या रील्स, फोटोशूट्स कायमच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतात. याबरोबरच तिचा अभिनयही सगळ्यांना खूप आवडतो. आजवर तिने साकारलेल्या भूमिकांनी अनेकांचं मन जिंकलंय. गेल्या काही वर्षांत साराने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आणि आता ती आणखी एका नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. सारा आता मेट्रो इन डायनो या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

नुकतंच झूम टीव्ही चॅनेलने त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर साराचे सिनेमाचं शूटिंग करतानाचे फोटोज शेअर केले. साराच्या सिनेमातील लूकची चर्चा आता सगळीकडे रंगलीय . पहिल्यांदाच सारा आता वेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. फ्रिन्ज हेअर कट, डोळ्यावर चष्मा , पांढरा हार्ट प्रिंट असलेला शर्ट आणि त्यावर लाल रंगाचा स्कार्फ या लूकमध्ये सारा या दिसणार असल्याचा या फोटोवरून येतोय सारासोबतच या सिनेमात अभिनेता आदित्य रॉय कपूरसुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फोटोमध्ये त्याच्या लूकवरून सिनेमात एखादा सलग्नाचा सीन शूट होत असावा असं वाटतंय.

आदित्य आणि सारा पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. बर्फी फेम दिग्दर्शक अनुराग बसू हा सिनेमा दिग्दर्शित करत असून यात अनुपम खेर, कोंकणा सेन शर्मा आणि फातिमा सना शेख यांच्याही मुख्य भूमिका असल्याची चर्चा आहे. सप्टेंबर २०२४ मध्ये हा सिनेमा रिलीज होणार असल्याचं म्हंटलं जातंय. या आधी अनुराग बसू यांचा लुडो हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला होता त्यानंतर तब्बल चार वर्षांनी ते सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत.

तर साराचा नुकताच 'ए वतन मेरे वतन' हा सिनेमा अमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला. प्रेक्षकांनी या सिनेमाला उत्तम प्रतिसाद दिला. साराच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं. तिने या सिनेमात स्वातंत्र्यसैनिक उषा मेहता यांची भूमिका साकारली होती. स्वातंत्र्यलढ्यातील 'चले जाव' चळवळीतील उषा यांच्या योगदानावर हा सिनेमा आधारित होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com