
कॉमेडियन समय रैनाचा 'इंडियाज गॉट लेटेन्ट' हा शो सध्यामोठ्या वादात सापडला आहे. अश्लील वक्तव्य केल्याने युट्युबर रणवीर अलाहाबादिया याला सगळ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. त्याने कार्यक्रमात पालकांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्याला विरोध होताना दिसतोय. या कार्यक्रमात वापरलेली भाषा, विषय फारच आक्षेपार्ह, असभ्य आणि अश्लील असून या कार्यक्रमावर बंदी घालावी, अशी मागणी होतेय. अशातच आता भाडिपाच्या 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' या कार्यक्रमावरही बंदी आणावी अशी मागणी होताना दिसतेय. त्यावर सारंग साठेने प्रतिक्रिया दिलीये.