
ग्रामीण भागातील महिला सशक्तीकरणाची ही कथा त्यांच्या संघर्षांची, यशाची आणि अडथळ्यांवर मात करण्याच्या जिद्दीची आहे. गावातील महिला जेव्हा समाजाच्या विकासासाठी पुढाकार घेतात, तेव्हा त्यांना अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. परंतु ‘सौभाग्यवती सरपंच’ या नवीन वेबसीरिजमध्ये महिलांनी दाखवून दिले की जिथे महिलांना स्वप्न पाहण्याचे स्वातंत्र्य दिले जाते, तिथे समाजाची खरी प्रगती होते. संतोष कोल्हे दिग्दर्शित, या सीरिजमध्ये देविका दफ्तरदार, किशोर कदम, नागेश भोसले आणि अश्विनी कुलकर्णींसारख्या कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. ही सिरीज ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटी’वर पाहता येईल.