नाटकवेड्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; गाजलेली मराठी नाटकं पाहा फक्त १०० रुपयात; कधी कुठे वाचा सविस्तर

MARATHI DRAMA IN JUST 100 RUPEES : मराठी नाटक प्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या ४ दिवसात गाजलेली मराठी नाटकं त्यांना केवळ १०० रुपयात पाहता येणार आहेत.
NATAK IN 100 RUPEES

NATAK IN 100 RUPEES

ESAKAL

Updated on

मराठी रंगभूमीला नाटकांची मोठी पार्श्वभूमी आहे. मराठी प्रेक्षक आवर्जून नाटक पाहायला जातात. चित्रपटांच्या गर्दीत आजही नाटकांच्या प्रेक्षकांची संख्या प्रचंड आहे. सध्या २८ व्या सांस्कृतिक कलादर्पण सोहळ्याचा नाट्य महोत्सव सुरू आहे. या सोहळ्यात मराठी व्यावसायिक नाटक विभागातील स्पर्धेतील एकूण २२ नाटकांमधून अंतिम ५ नाटकांची निवड "मराठी व्यावसायिक नाट्य महोत्सवा' साठी झाली आहे. आता ही पाच नाटकं प्रेक्षकांना केवळ १००, २०० आणि ३०० रुपयांच्या शुल्कात पाहायला मिळणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com