
मराठी, हिंदी, तेलुगु, तमिळ, कन्नड, गुजराती, भोजपुरी, मल्याळी, इंग्रजी... अशा अनेक भाषांमधील चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या काही मोजक्याच अभिनेत्यांपैकी एक सयाजी शिंदे! रुपेरी पडद्यावर खलनायक ताकदीनं रंगवणारे सयाजी शिंदे सगळ्यांना माहिती आहेतच पण प्रत्यक्ष आयुष्यात नायक म्हणून त्यांचं काम अधिक महत्त्वाचं आहे. पर्यावरण संवर्धनासाठी गेल्या दशकभरात महाराष्ट्रात त्यांनी अनेक वृक्षारोपण मोहिमा राबवल्या, स्वतः २५ हजारांहून अधिक झाडं लावली , त्यामुळे अनेक उजाड माळरानं वृक्षवेलींनी बहरली.पर्यावरण रक्षणासाठीचे हे योगदान मोलाचे!