
प्रत्येकाचं आपल्या आईवर प्रेम असतं. कुणाचं कमी तर कुणाचं जास्त असतं. पण अशीही काही मुलं असतात जी आपल्या आईसाठी जगातील प्रत्येक गोष्ट करायला तयार असतात. आपल्या आईने आपल्यापासून दूर जाऊ नये असं प्रत्येकालाच वाटत असतं. मात्र प्रत्येकाला कधीना कधी या जगाचा निरोप घ्यावाच लागतो. मात्र अभिनेते सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आईला जिवंत ठेवण्यासाठी एक खास गोष्ट केलीये. ज्यामुळे त्यांची आई कमीतकमी ५०० वर्ष जिवंत राहील. ती कशी? चला पाहूया.