
'ठरलं तर मग' मालिका प्रेक्षकांची अत्यंत लाडकी आहे . त्यातही सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलीये. त्यात प्रिया कायमच अर्जुन आणि सायलीच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करते. तिने अश्विनसोबत लग्न याच कारणासाठी केलं की सुभेदारांच्या घरात राहता यावं. आता मालिकेत एक मोठा ट्विस्ट आलाय. सायलीला चाइल्ड ट्रॅफिकिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलीये. हे समजताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसणार आहे. सोबतच मधुभाऊ प्रियाच्या बोलण्यामुळे चिडून तिला कानशिलात लागवणार आहेत.