
saili deodhjar at prajaktakunj.
esakal
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. ती अभिनेत्री असण्यासोबतच एक उद्योजिकादेखील आहे. तिचा स्वतःचा दागिन्यांचा ब्रँड आहे. यासोबतच ती स्वतः डान्स क्लासदेखील घेते. तिने तिचं कवितांचं पुस्तकही प्रदर्शित केलंय. दोन वर्षांपूर्वी तिने 'प्राजक्तकुंज' हे फार्महाऊस विकत घेतलं होतं. या फार्महाउसवर ती 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या कलाकारांसोबत गेली होती. आता आणखी एक मराठी अभिनेत्री तिच्या फार्महाऊसवर पोहोचली आहे.