
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेले कित्येक महिने टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. मालिका भलेही संथ गतीने सुरू असली तरी त्यात येणारे ट्विस्ट आणि टर्न प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यासाठी पुरेसे ठरतायत. महीपत, साक्षी आणि प्रिया यांच्या जाळ्यातून मधुभाऊंची सुटका करण्यासाठी अर्जुन आणि सायली प्रयत्न करतायत. अशातच आता मालिकेत आणखी एक ट्विस्ट आलाय. प्रेक्षक जे पाहण्यासाठी आतुरले होते. ते अखेर घडणार आहे. सायली अर्जुनला चक्क गुडघ्यावर बसून प्रपोज करणार आहे.