
Ashok Saraf: मराठी सिनेसृष्टीचे बादशाह असलेले हरहुन्नरी नट अशोक सराफ वयाच्या ७७ व्या वर्षीही काम करतायत. त्यांची ऊर्जा पाहून अनेकांना अप्रूप वाटतं. अशोक सराफ आणि निवेदिता सराफ हे नेहमीच सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असतात. सिनेसृष्टीत त्यांचं प्रत्येकाशी आपुलकीचं नातं आहे. मात्र अभिनेत्री सायली संजीव हिच्यासोबत त्यांचं खास नातं आहे. काहींना ती त्यांची खरी लेक वाटते. मात्र ती त्यांची मुलगी नसूनही सायली अशोक यांना पप्पा आणि निवेदिता यांना आई हाक मारते. मात्र हे नातं नेमकं कसं सुरू झालं हे तुम्हाला ठाऊक आहे का?