
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या "समसारा" या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच शिगेला पोहोचली आहे. चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखांचा इतिहास काय? त्यांच्या आयुष्यातलं गूढ काय? असे अनेक प्रश्न या ट्रेलरने निर्माण केले असून, "समसारा" हा चित्रपट येत्या २० जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. संचय प्रॉडक्शन्सच्या पुष्कर योगेश गुप्ता यांची निर्मिती असलेल्या "समसारा" या चित्रपटाचं दिग्दर्शन सागर लढे यांनी केले आहे.