
दिग्दर्शक श्रीकांत ओडेला यांच्या द पॅराडाईज चित्रपटातून दक्षिण सुपरस्टार नानी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटासाठी हैदराबादमध्ये तब्बल 30 एकर जागेवर पसरलेला झोपडपट्टीचा सेट उभारला जातोय, जो बाहुबली मधील महिष्मती साम्राज्याइतकाच मोठा असणार आहे.
नायकाचा प्रवास झोपडपट्टीतून सत्तेकडे कसा होतो, हे दाखवण्यासाठी हा विशेष सेट तयार करण्यात आला असून त्याच्या मध्यभागी एक मोठी कमान असेल, जी पोस्टरमध्ये आधीच दिसली आहे.