shahrukh khan
shahrukh khan esakal

'कभी खुशी कभी गम'च्या हेलिकॉप्टर सीनवरून नाराज होता किंग खान; कारण वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Shah Rukh Khan On kabhi khushi kabhie gham: लोकप्रिय बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान रोमान्सचा किंग म्हणवला जातो मात्र त्याचा एक किस्सा दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी सांगितलं आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याने त्याच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूड चित्रपट केलेत. त्याला बॉलिवूडमध्ये रोमान्सचा बादशहा म्हटलं जातं. एसआरकेने सगळ्यांना प्रेमाची परिभाषा शिकवली असं म्हटलं जातं. मात्र खऱ्या आयुष्यात शाहरुखला रोमँटिक चित्रपट करायला आवडत नाहीत, असं वक्तव्य दिग्दर्शक निखिल आडवाणीने केलं आहे. हेच नाही तर एसआरकेला त्याचा 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटातला त्याचा हेलिकॉप्टर सीन आवडला नव्हता असंही त्याने सांगितलंय. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने शाहरुखबद्दल काही खास गोष्टी सांगितल्या आहेत.

जेव्हा जेव्हा 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाबद्दल बोललं जातं तेव्हा तेव्हा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतो तो शाहरुख आणि जया बच्चन यांचा तो सीन ज्यात शाहरुख हेलिकॉप्टरमधून खाली उतरतो आणि जया यांना आपल्या मुलाच्या येण्याची चाहूल लागते. त्या आरतीचं ताट घेऊन दरवाजाकडे धावत जातात. या सीनमध्ये शाहरुखला आपली एंट्री अजिबात आवडली नव्हती. निखिलने नुकतीच सायरस सेजला मुलाखत दिली. यात बोलताना तो म्हणाल, 'शाहरुख आणि माझ्यात अनेकदा गॅप गोष्टी व्हायच्या की करण आणि आदित्य लव्ह स्टोरी करतायत तर आपण काहीतरी वेगळं करूया. त्याला लव्हस्टोरी आवडत नव्हत्या. 'दिल से' हा चित्रपट त्याचा आवडता आहे. त्याला त्याचा 'राम जाने' हा चित्रपटही आवडतो ज्यात्याने डोक्यावर पट्टी बांधली आहे.

शाहरुखला आवडला नाही हेलिकॉप्टर वाला सीन

निखिल आडवाणी म्हणाला, 'जेव्हा आम्ही शाहरुखला सांगितलेलं की त्याला 'कभी खुशी कभी गम' च्या सेटवर हेलिकॉप्टरमधून एंट्री करायची आहे तेव्हा तो खूप खुश झालेला. कारण त्याला वाटलेलं की त्याला वरून उडी वगरे मारायची असेल. पण त्याला फक्त खाली उतरायचं होतं. ते ऐकल्यावर मात्र तो नाराज झाला. त्याला त्यांची एंट्री आवडली नव्हती. पण हा सीन शाहरुखपेक्षा जया यांच्यावर आधारलेला होता कारण त्यांना त्यांच्या मुलाची चाहूल आधीच लागते.' शाहरुख आणि निखिल यांनी 'कुछ कुछ होता है', 'मोहब्बतें' आणि 'कभी खुशी कभी गम' हे चित्रपट एकत्र केले आहेत.

shahrukh khan
त्याला कोणतीही पदवी मिळाली नाही पण... लक्ष्याच्या ७० व्या जन्मदिनाबद्दल प्रिया बेर्डेंची पोस्ट, नेमकं काय म्हणाल्या?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com