श्रेया देशमुख
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आपल्या कुटुंबाबद्दल नेहमी प्रेम दर्शवत असतो. नेहमीच तो कुटुंबासाठी काही ना काही करताना पहायला मिळतो. शाहरुखला त्यांच्या मुलाविषयी विशेष प्रेम आहे. आर्यन , सुहाना, अबराम यांच्याविषयी तो नेहमीच सोशल मीडियावर प्रेम दर्शवत असतो. दरम्यान नुकतच सुहाना खानने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोवर बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने प्रतिक्रिया दिली. सध्या किंग खानची प्रतिक्रिया सोशल मीडियावर वायरल झाल्याचं पहायला मिळतय.