
Bollywood Celebrity Threats: बॉलिवूडचा नवाब असलेल्या सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री हल्ला करण्यात आला. त्याच्या घरात घुसुन आरोपीने चोरीचा प्रयत्न केला होता. घरात असलेल्या मदतनीस व्यक्तीने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने सैफवर हल्ला चढवला. यात सैफच्या मानेवर, पाठीवर आणि हातावर गंभीर जखमा झाल्यात. या प्रकरणात आता आणखी मोठी बातमी समोर येतेय. या चोराने सैफच्या घरात घुसण्यापूर्वी बॉलिवूडचा बादशाह किंग खानच्या घराचीही रेकी केली असल्याची माहिती आहे.