
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान हा इंडस्ट्रीचा किंग आहे. तो इंडस्ट्रीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो. मात्र 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याला दुखापत झालीये. अॅक्शन सीन करताना शाहरुखच्या पायाला मार बसला. दरम्यान आता शाहरुख खानला अमेरिकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. त्याच्या मांसपेशींना दुखापत झालीये. त्याला डॉक्टरांनी दोन महिने सक्तीचा आराम सांगितलाय. मात्र जर शाहरुखला काही झालं तर इंडस्ट्रीचं किती नुकसान होईल हे तुम्हाला ठाऊक आहे का? इंडस्ट्रीने शाहरुखवर किती पैसे लावलेत माहितीये?