शाहिद कपूर नेहमीच चित्रपटातील जबरदस्त अॅक्शनमुळे प्रसिद्ध आहे. त्यात आता त्याच्या 'देवा' चित्रपटाच्या टीझरमुळे चाहते चित्रपटाच्या रिलीज होण्याची वाट पाहत आहेत. काही दिवसापूर्वी चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले होते. त्यानंतर आज शाहिदने चाहत्यांना एक सप्राईज देत 'देवा' चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे.