
आपली चित्रपटातील भूमिका जिवंत करण्यासाठी कलाकार जीवतोड मेहनत घेताना दिसतात. त्या पात्रांना जिवंत करण्यासाठी त्यांचा अभ्यास करतात अनेक युक्त्या वापरतात. जेणेकरून प्रेक्षक त्या सीनसोबत आणि पात्रासोबत जोडले जायला हवे. नुकताच एका बॉलिवूड अभिनेत्रीने चित्रपटातील सीनबद्दल एक चकीत करणारा खुलासा केला आहे. दिग्दर्शकाने अभिनेत्रीला एका सीनसाठी पॅन्टमधे लघवी करण्यास सांगितलं होतं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही गोष्ट अभिनेत्रीने देशील मान्य केली. आता स्वतः अभिनेत्रीने याबाबतचा खुलासा केला आहे.