
आपल्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीत छोटा आणि मोठा पडदा गाजवणारे लोकप्रिय अभिनेते शरद पोंक्षे हे कायमच निरनिराळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आले. गेली ४० वर्ष ते अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी अनेक नाटकांमधूनही प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यातील एक नाटक म्हणजे 'पुरुष'. जयवंत दळवी यांच्या 'पुरुष' या नाटकाने एकेकाळी मराठी रंगभूमीवर राज्य केलं. आता हेच नाटक नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला आलं. यात शरद आहेत. मात्र याच प्रयोगाच्या वेळेस ते सगळे डायलॉग विसरून गेले. इतक्या वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडल्याने ते गहिवरून गेले होते.