
'चला हवा येऊ द्या' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला निलेश साबळे सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. निलेशने तब्बल १० वर्ष 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम चोखपणे चालवला. दिग्दर्शनापासून ते लेखनापर्यंत सगळ्याच गोष्टी निलेशने योग्य पद्धतीने हाताळल्या. मात्र लोकप्रिय राशिचक्राकर शरद उपाध्ये यांनी एक पोस्ट करत निलेशवर आरोप केले होते. त्याच्या डोक्यात हवा गेली आहे असं म्हणत त्याला सुनावलं होतं. त्यानंतर निलेशनेदेखील त्यावर प्रत्युत्तर दिलं. मात्र आता शरद यांनी आणखी एक पोस्ट करत नेटकऱ्यांनाच धन्यवाद म्हटलं. त्यावरून नेटकरी मात्र त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.