

The actress also revealed her dream of becoming the "Amrish Puri of Marathi television" while hoping to play a strong positive lead in the future.
Sakal
शर्मिष्ठा राऊत, अभिनेत्री
स्टार प्रवाहवरील ‘सुना येती घरा’ या नव्या मालिकेत मी ‘पद्मा’ ही भूमिका साकारत आहे. पद्मा ही घरातली मोठी मुलगी आहे आणि ही गोष्ट दोन बहिणींची आणि दोन कुटुंबांची आहे. खरं तर दोन बहिणी म्हटलं, की कुटुंब एकच असायला हवं; पण इथे ते विभागलं गेलं आहे. कारण केवळ लहान बहिणीने प्रेमविवाह केला. तिने एका अनाथ तरुणाशी पळून जाऊन लग्न केलं आणि त्यातून दोन घरं कायमची वेगळी झाली.