

SHATRUGHNA SINHA
ESAKAL
बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांच्या यांच्या आयुष्यात अनेक चढउतार आले. त्यांनी 'खामोश' म्हणत अनेकांना गप्प बसवलं. त्यांनी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना टक्कर दिली. मात्र त्यांच्या करिअरप्रमाणे त्यांचं वैयक्तिक आयुष्यदेखील चाहत्यांमध्ये चर्चेत राहिलं. त्यांचं आणि अभिनेत्री रीना रॉय यांचं अफेअरदेखील खूप गाजलं. मात्र अभिनेते शत्रुघ्न यांचे भाऊ राम सिन्हा यांनी त्यांना थेट रिनासोबत लग्न करण्याची धमकी दिली होती. जी ऐकून ते स्वतः स्तब्ध झालेले. त्यावेळेस शत्रुघ्न यांची पत्नी पूनम सिन्हा ८ महिन्यांच्या गरोदर होत्या.