
'काटा लगा' फेम शेफाली जरीवालाने ४२व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला. तिच्या अशा अचानक निधनाने सगळ्यांना मोठा धक्का बसला. हृदयविकाराच्या झटक्याने तिचं निधन झालं. वयाच्या २० व्या वर्षी शेफालीने काटा लगा या गाण्यातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मात्र तिच्या जाण्याची बातमी ऐकून सगळेच चकीत झालेत. शेफालीच्या निधनाने संपूर्ण परिवारावर दु: खाचा डोंगर कोसळला आहे. आता अभिनेत्रीची आई सुनीता यांचा रुग्णालयाबाहेरील एक हृदयद्रावक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे.