
छोट्या पडद्यावर अनेक लोकप्रिय मालिका होऊन गेल्या. त्यातही अल्फा मराठी म्हणजे आताचं झी मराठी वाहिनीवर अनेक अशा मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या ज्या कायमच्या प्रेक्षकांच्या मनावर कोरल्या गेल्या. या मालिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं. त्यातील एक मालिका म्हणजे 'श्रीयुत गंगाधर टिपरे'. या मालिकेचा स्वतःचा असा प्रेक्षकवर्ग आहे.या मालिकेची प्रेक्षकांच्या मनातली जागा अजूनही कुणीही घेऊ शकलेलं नाही. या मालिकेची कथा आणि यातील कलाकार आजही प्रेक्षकांच्या तोंडावर असते. यातील टिपरे कुटुंब फार गाजलं. आता या कुटुंबातील दोघांची ग्रेट भेट झालीये.