

shiv thakare
esakal
या महिन्याच्या सुरुवातीला 'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरेने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता, जो एखाद्या खऱ्या लग्नासारखा वाटत होता. फोटोमध्ये शिव नवरदेवाच्या कपड्यात एका मुलीसोबत आनंदाने पोझ देताना दिसत होता, परंतु त्या मुलीचा चेहरा लपवण्यात आला होता. फोटो शेअर करताना शिवने "फायनली (अखेर) ♥️✨" असं लिहिलं होतं. यामुळे त्याचे चाहते आणि मित्रमंडळींमध्ये तो लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा सुरू झाली. इतकंच नाही तर चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनीही या पोस्टवर कमेंट्स करून या अफवांना खतपाणी घातलं. आता अखेर त्याने या फोटोमागचं सत्य सांगितलं आहे.