
छोट्या पडद्यावरील मालिका म्हणजे प्रेक्षकांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. या मालिकांमधील कलाकार हे देखील प्रेक्षकांसाठी खास असतात. काही कलाकार कायमचे प्रेक्षकांच्या मनात घर करून रहातात. हे पात्र करावं तर याच अभिनेत्रीने किंवा अभिनेत्याने असंही काही ठिकाणी होताना दिसतं. कलाकारांना देखील या पात्रांमुळे ओळख मिळते. मात्र जेव्हा हे कलाकार अचानक मालिका सोडून जातात तेव्हा मात्र प्रेक्षकांचा हिरमोड होतो. झी मराठीवरील अशाच एका अभिनेत्रीने मालिकेला रामराम ठोकलाय. तिने अचानक मालिकेतून एक्झिट घेतलीये.