'शिवा'चा आशु नवरा झाला! शाल्व किंजवडेकरचं झालं शुभमंगल सावधान, वधूवराच्या पेहेरावाने वेधलं लक्ष

Shalva Kinjawdekar Wedding First Photo : 'शिवा' मालिकेतील आशु म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याचा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडलाय.
_shalva kinjawdekar
shalva kinjawdekaresakal
Updated on

सध्या हिंदी सिनेसृष्टीसोबतच मराठी मालिकाविश्वातही लग्नाचे वारे वाहताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. त्यात छोट्या पडद्यावरीलही काही कलाकारांचं समावेश होता. आता आणखी एका अभिनेत्याचं शुभमंगल पार पडलं आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'शिवा' मधील आशु म्हणजेच अभिनेता शाल्व किंजवडेकर याने आज १४ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली आहे. तो त्याची गर्लफ्रेंड श्रेया दफळापूरकर हिच्यासोबत लग्नबंधनात अडकला आहे. मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com