
सध्या सगळीकडे 'छावा'ची चर्चा होतेय. यातून छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याबद्दल सगळ्यांना ठाऊक झालं. त्यांनी धर्माच्या रक्षणासाठी आपला जीव पणाला लावला. मात्र त्यांच्या मृत्यूनंतर हे स्वराज्य कुणी टिकवलं असा प्रश्न अनेकांना पडतो. स्वराज्यरक्षक ताराराणी भोसले यांनी हे स्वराज्य राखलं मात्र त्यांच्यापूर्वी शिवबाचा आणखी एक पुत्र या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला होता. त्याच्याबद्दल आणि त्याच्या कार्याबद्दल फारशी कुणाला माहिती नाही. ते होते छत्रपतींचे धाकटे चिरंजीव छत्रपती राजारामराजे भोसले.