
भारतामध्ये अनेक वैविध्यपूर्ण सण साजरे केले जातात, जे आपल्याला आपल्या रुढी-परंपरा जपायला, निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करायला, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत आनंदाचे क्षण घालवायला आणि भारतीय परंपरेचा वारसा पुढे न्यायला मदत करतात. अशाच एका परिपूर्ण सणांपैकी एक म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर आम्ही नुकत्याच विवाहबद्ध झालेल्या मराठी अभिनेत्री शिवानी सोनार यांच्याशी खास संवाद साधला.